Home हिंदी अतीवृष्टीने शेताचे झाले तलाव !

अतीवृष्टीने शेताचे झाले तलाव !

234
0

अकोला: गत काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून नापिकीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, दरम्यान या वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने संध्यस्थितीत पिके समाधानकारक होती दरम्यान गत आठ दिवसांपासून पावसाने झळी लावल्याने तृर्त शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे दरम्यान शेतकरी राजा कमालीचा आर्थिक संकटात असताना या वर्षी मिळेल त्या मार्गाने आर्थीक जुळवाजुळव करून बी बियाणे खते कीटकनाशके आधी खरेदी करून मोठ्या आशेने पेरणी केली दरम्यान गत आठवड्या पासून बोरगाव मंजू परिसरातील पिकांना फटका बसला आहे.

दरम्यान येथील बोरगाव मंजू भाग एक मधील शेतकरी मंगेश बाबुलाल काळे या शेतकऱ्याने आपल्या चार एकर जमीनीत मुग उळीद सोयाबीन कापूस होते नव्हते विकटाक करून आर्थिक जुळवाजुळव करून शेती मशागत सह पेरणी केली. दरम्यान गत आठवड्या पासून पावसाचे पाणी शेतात शिरुन शेतात तलाव झाल्याने उभे पिके जळुन आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here