Home Builders & Developers Good News | रविवारी “डब्ल्यूकेडी नेस्ट” मध्ये फ्लॅट विकत घेणाऱ्या कुटुंबांना ताबा...

Good News | रविवारी “डब्ल्यूकेडी नेस्ट” मध्ये फ्लॅट विकत घेणाऱ्या कुटुंबांना ताबा देणार

दुसऱ्या टप्प्यातील “डब्ल्यूकेडी निलय” या नव्या प्रकल्पाचे लाँचिंग आणि प्री-बुकिंग होणार सुरु

नागपूर ब्युरो : शहरालगतच्या खडगाव रोड, लावा येथील ढोकणे पाटील नगरात बांधण्यात आलेल्या डब्ल्यूकेडी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ” डब्ल्यूकेडी नेस्ट” या प्रकल्पात फ्लॅट बुक केलेल्या कुटुंबांना रविवार, 1 ऑगस्ट 2021 रोजी त्यांच्या फ्लॅटची चाबी प्रदान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम वाडी येथील “सॉलीटेयर” सभागृहात संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष नाना भाऊ गावंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ सभापती भारती अनिल पाटील, जि. प. सदस्य ममता ताई धोपटे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते भीमरावजी कडू, सुजित नितनवरे, महेश चोखांद्रे, शैलेश थोराने पाटील, राजेंद्र घावत, तुषार कोल्हे उपस्थित राहतील.

घनश्याम ढोकणे, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डब्ल्यूकेडी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स

याच कार्यक्रमात डब्ल्यूकेडी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ” डब्ल्यूकेडी नेस्ट” या प्रकल्पात फ्लॅट बुक केलेल्या कुटुंबांना त्यांच्या फ्लॅटची चाबी प्रदान करण्यात येईल आणि दुसऱ्या टप्प्यातील “डब्ल्यूकेडी निलय” या नव्या प्रकल्पाचे लाँचिंग आणि प्री-बुकिंग यावेळी आरंभ करण्यात येईल अशी माहिती डब्ल्यूकेडी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम ढोकणे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here