Home मराठी Maharashtra | पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा, जनतेला न्याय द्या

Maharashtra | पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा, जनतेला न्याय द्या

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा लोकांशी संवाद अद्याप तसाच चालु आहे. नुकतेच फडणवीस पश्चिम महाराष्ट्राच्या दौºयावर गेले होते. याठिकाणी त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांचा पुनर्वसनाची मागणी लावून धरली. यावेळी लोकांमध्ये उपस्थित एका व्यक्ती ने फडणविसांना म्हटलं की ‘पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून परत या आणि राज्याच्या जनतेला न्याय द्या.

सदर वीडियो आता वायरल होत आहे. अनेक लोकं म्हणत आहेत, बघा महाराष्ट्राच्या भावना काय आहेत. कोकणात अतिवृष्टीच्या वेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस स्वत: तिथे पोहोचले होते. कोरोना संक्रमणाच्या काळात देखील इतर राजकीय नेत्यांप्रमाणे घरात बसण्यापेक्षा त्यांनी लोकांमध्ये जावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

आता जेव्हा पाऊस महाराष्ट्राला सतावत आहे, तेव्हा पायाला भिंगरी लागल्यागत देवेंद्र फडणवीस राज्याच्या कानाकोपºयात जावून लोकांच्या वेदना समझून घेत आहेत. गावागावात त्यांच्याप्रती लोकांमध्ये आस्था दिसून येते हा लोकप्रतिनिधी म्हणून ते आपली जवाबदारी इमाने इतबारे पार पाडित आहेत याचा पुरावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here