Home Health Nagpur । 10 पेक्षा कमी रुग्ण, शून्य मृत्यू, महाराष्ट्राची उपराजधानी कोरोनामुक्त होणार...

Nagpur । 10 पेक्षा कमी रुग्ण, शून्य मृत्यू, महाराष्ट्राची उपराजधानी कोरोनामुक्त होणार !

नागपूर ब्युरो : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भयावह परिस्थिती अनुभवणाऱ्या नागपूर जिल्ह्याची (Nagpur corona) आता कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्या दहाच्या आत आहे. तर मृत्यूसंख्या शून्यावर आली आहे. त्यामुळं नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळालाय.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत वाईट होती. दररोज 7 हजारांवर रुग्ण पॉझिटिव्ह येत होते. तर दीडशेवर दररोज मृत्यू व्हायचे. बेड्स उपलब्ध नसल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा होता. ऑक्सिजन अभावी अनेकांचा जीव गेला. प्रत्येक घरात कोरोना रुग्ण होते. मात्र, हळूहळू परिस्थिती सामान्य झाली आणि आता तर जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याची स्थिती आहे. कारण जिल्ह्यात दररोज रुग्णांची संख्या 10 च्या खाली आहे तर मृत्यू संख्या शून्यावर आली आहे.

प्रशासन, डॉक्टर्स आणि नागरिकांच्या सहकार्याने हे शक्य झालं. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. तिसऱ्या लाटेचा धोका अजून कायम आहे. अशावेळी नागरिकांनी अधिक जबाबदारीनं वागण्याची गरज आहे, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

देशातील कोरोना रुग्नांची आकडेवारी
  • देशात 24 तासात नवे रुग्ण – 35,342
  • देशात 24 तासात डिस्चार्ज – 38,740
  • देशात 24 तासात मृत्यू – 483
  • एकूण रूग्ण – 3,12,93,062
  • एकूण डिस्चार्ज – 3,04,68,079
  • एकूण मृत्यू – 4,19,470
  • एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,05,513
  • आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 42,34,17,030
  • गेल्या 24 तासातील लसीकरण – 54,76,423

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here