Home कोरोना Nagpur | सर्व प्रकारच्या दारूचे दुकान आज बंद, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

Nagpur | सर्व प्रकारच्या दारूचे दुकान आज बंद, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

626
नागपूर ब्युरो : कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे तसेच कोरोना विषाणू वर प्रभावी व परिणामकारक नियंत्रणासाठी आज (शनिवारी) संपूर्ण जिल्ह्यात जनतेच्या सहकार्याने बंद पाळण्यात आला. पण दारूचे दुकान शनिवारी सुरु असल्याने त्यावर गर्दी दिसून आली.

शनिवारी जनतेनेही बंदला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बंद मध्ये आता सर्व प्रकारच्या दारूच्या दुकानांचा ही समावेश राहणार आहे त्यामुळे उद्या रविवारी जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने सुद्धा बंद मध्ये सामील राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली आहे.

हिंगोलीत 1 ते 7 मार्च दरम्यान संचारबंदी

हिंगोली जिल्ह्यातील वाढत्या कोरोना चा प्रादुर्भाव पाहता हिंगोली चे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोलीत 1 ते 7 मार्च दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात त्यांनी आज आदेश काढले आहेत या सात दिवसांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना जिल्ह्यामध्ये मुभा असणार आहे त्या व्यतिरिक्त शासकीय निमशासकीय कार्यालय बँका केवळ शासकीय कामकाजा करीता सुरू राहतील तसेच दूध विक्रीला वेळेचे बंधन असणार आहे व इतर सर्व व्यवहार हे बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश त्यांनी काढले आहेत या दरम्यान कोणतेही नागरिक बाहेर पडल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची त्यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.