नागपूर ब्युरो : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर निता ठाकरे, एयर मार्शल यल्ला उमेश, मेजर जनरल एन एस सोहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी त्यांचे स्वागत केले.





















