Home Maharashtra #Nagpur । पेडणेकर ज्वेलर्सच्या प्रदर्शनाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

#Nagpur । पेडणेकर ज्वेलर्सच्या प्रदर्शनाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दागिन्यांच्या सौंदर्याने मोहवून टाकणाऱ्या भव्य प्रदर्शनीचा आज शेवटचा दिवस

नागपूर ब्युरो : मुंबईतील प्रसिद्ध जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या वतीने आयोजित भव्य दागिन्यांच्या प्रदर्शनाला नागपूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हिरे, सोनं आणि चांदीच्या आकर्षक दागिन्यांनी सजलेल्या या प्रदर्शनाचा आज, सोमवार २१ जुलै, हा शेवटचा दिवस आहे.

हॉटेल सेंटर पॉइंट, रामदासपेठ, नागपूर येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन १९ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्त्या वृंदा विकास ठाकरे, ओबीसी नेत्या निर्मला मानमोडे, निर्मल अर्बन बँकेच्या अध्यक्षा पूजा मानमोडे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा वैशाली चोपडे, सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका चित्रा पराते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले.

या प्रदर्शनात “Amalia – The Eternal Shine” या नव्या ब्रँड कलेक्शनमधील ₹४००० पासून सुरू होणारे हिऱ्याचे दागिने, तसेच “You ‘N’ Me Collection” अंतर्गत ₹५०० पासून उपलब्ध ९२५ सिल्व्हर ज्वेलरीचे प्रकार ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. हे दागिने रोजच्या वापरासाठी व गिफ्टिंगसाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील महिला उपस्थित राहून शुभेच्छा देत आहेत. अदिती श्रीवास्तव, सुरेखा चौधरी, रिंकू घोष, धनश्री मते, प्रीती तायडे आणि ममता डुकरे यांनीही प्रदर्शनाला भेट दिली.

सर्व पाहुण्यांचे स्वागत योगेश पेडणेकर, प्रदर्शन प्रमुख सागर हलदणकर आणि राजेश सोनटक्के यांनी केले.

आयोजिका आसावरी पेडणेकर यांनी नागपूरकरांना आवाहन केले आहे की, गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह दागिन्यांचा अनुभव घेण्यासाठी आजच या प्रदर्शनाला भेट द्यावी, कारण आजच त्याचा अंतिम दिवस आहे.