Home मराठी घोगली – बेसा शुअरलाईन समस्या संदर्भात जि. प.सदस्या मेघा मानकर यांची पाहणी

घोगली – बेसा शुअरलाईन समस्या संदर्भात जि. प.सदस्या मेघा मानकर यांची पाहणी

556

नागपूर ब्यूरो: स्वामीधाम नगरी घोगली व बेसा परिसरात शुअरलाईनची भयंकर समस्या निर्माण झाली असल्याने नवीन लाईन टाकण्यासाठी पिपळा व बेसा ग्रामपंचायत यांनी संयुक्त पाहणी केली. परिसरात रोगराई पसरु नये तसेच नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून त्वरीत उपाययोजना कराव्यात अशी सुचना जि. प.सदस्या मेघा मानकर यांनी दोन्ही ग्रामपंचायत अधिकारी यांना केल्या. याप्रसंगी पिपळा -घोगली गट ग्रामपंचायतचे सरपंच नरेश भोयर,.प्रभु भेंडे,किशोर वानखेडे,प्रकाश भोयर,सुनील रहाटे, सचिव घारपुरे व खरपुरीया ,जयश्री सुरवाडे,रमेश कदम,खुशाल हेडाऊ,पुरुषोत्तम निळोपंत,सांगोळेकाका,धोटे इत्यादी उपस्थित होते.