नागपूर ब्युरो : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, समतादूत प्रकल्प नागपूर जिल्हा मार्फत वृक्षारोपण पंधरवाडा व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रम अंतर्गत ग्राम पंचायत लाव्हा नागपूर ग्रामीण येथील ओम साई सृष्टी अपार्टमेंट लावा येथे हिंगणा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण लागवड करून ” दैनंदिन जीवनात असणारे वृक्षांचे महत्त्व”या विषयावर आमदार समीर मेघे यांनी प्रबोधन केले. वृक्षारोपण पंधरवाड्यानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमास आम. समीरजी मेघे, ग्रा पं लाव्हा ची सरपंच सौ. ज्योत्सनाताई नितनवरे, सामाजिक कार्यकर्ते युवराज घोडे,पं स चे माजी उपसभापती सुजित नितनवरे, देवराव कडू, सां बां विभाग चे कुचेवार, गोखले, ग्रा पं लाव्हा येथील सदस्य व कर्मचारी, ग्रामस्थ तसेच बार्टी संस्थेचे जिल्हा प्रकल्प अधिकारी ह्रदयजी गोडबोडे, समतादूत दिप्तीताई मडके, अमोल खवशे, अल्ताफ कुरेशी, राष्ट्रपाल डोंगरे, प्रार्थना दिवे, शिवानी पसीने यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. आम. समीर मेघे यांनी बार्टी संस्थेचे धन्यवाद मानून, बार्टी समतादूत प्रकल्प व समतादूत खूप महत्त्वाचे कार्य करीत असल्याचे सांगून बार्टी समतादूत प्रकल्पास पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.