Home Police Nagpur । क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता...

Nagpur । क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा

अप्पर पोलिस आयुक्त नवीन रेड्डी व पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या नेतृत्वात कारवाई

नागपूर ब्युरो : नागपूरचे अप्पर पोलिस आयुक्त नवीन रेड्डी व पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 2 श्रीमती विनिता साहू यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदाशिव अपार्टमेंट खरे टाउन पोस्ट सिताबर्डी येथील दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये क्रिकेट मॅच वर सट्टा लावला जात आहे.

सूत्रांकडून त्यांना माहिती मिळाली कि शुभम कुमार शंकरलाल राय वय 24 वर्ष रा. बारा पत्थर शिवनी मध्य प्रदेश ऑनलाइन पाकिस्तान सुपर लीग च्या ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट मॅच मध्ये खायवाडी करीत आहे अश्या माहितीवरून या ठिकाणी छापा मारण्यात आला असता शुभम कुमार शंकरलाल राय हा PSL 2021 चे 20-20 चे लाहोर विरुद्ध क्वेटा या सामन्यात ऑनलाइन खायवाडी करताना मिळून आला. झडती दरम्यान त्याचे कडून गुन्हा करताना वापरण्यात येणारे 7 मोबाईल, 3 टॅब , 1 मॅक बुक, 1 टीव्ही सेट ऑफ बॉक्स सह, 1 हार्ड डिस्क, 1 पोलो वोस्क वॅगन कार व 67,200/- रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 5,27,400 रूपायाचा मुद्देमाल सहित एक आरोपी पकडण्यात आला.

सीताबर्डी पोलिस स्टेशन येथे कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई नवीन रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग, श्रीमती विनिता साहू परिमंडळ क्र. 2 यांचे मार्गदर्शनात सपोनी अचल कपूर , पोउपनी कुणाल धुरट, सचिन जाधव, पोहवा अनिल त्रिपाठी, रामदास नारेकर, प्रशांत देशमुख, राकेश गोतमारे, आशिष वानखेडे, अमित भुरे यांनी पार पाडली.