Home मराठी Information । ईपीएफओ ने आधारकार्ड युएएन नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत...

Information । ईपीएफओ ने आधारकार्ड युएएन नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवली

मुंबई ब्युरो : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधीसाठी (ईपीएफओ ) वापरल्या जाणारा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (युएएन) आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यानुसार आता नोकरदारांना या दोन्ही गोष्टी लिंक करण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंतचा अवधी मिळाला आहे. यापूर्वी ईपीएफओ ने नोकरदारांना या कामासाठी 1 जूनपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर युएएन नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तुर्तास तरी नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.

पीएफ खाते आधारशी लिंक कसे कराल?
  1. स्टेप-1: ईपीएफओचे अधिकृत संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर जाऊन लॉग इन करा
  2. स्टेप-2: त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा. नंतर ई-केवायसी पोर्टलवर जा. या ठिकाणी link UAN aadhar वर क्लिक करा
  3. स्टेप-3: यूएएन अकाउंटशी नोंदणी झालेला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाइल नंबर अपलोड करा.
  4. स्टेप-4: त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी नंबर बॉक्समध्ये भरा. 12 नंबरचा आधार नंबर टाकून फॉर्म सबमिट करा. आता ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा.
  5. स्टेप-5: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडीवर एक ओटीपी येईल. त्याने आधार नंबरला व्हेरिफाय करा. या व्हेरिफिकेशननंतर तुमचे आधार पीएफ अकाउंटशी लिंक होईल.
आधी 30 जूनपर्यंत दिली होती मुदत

ईपीएफओ ने आधी येत्या 30 जूनपर्यंत पॅनकार्ड आधार कार्डासोबत लिंक न केल्यास ते रद्द होईल असे म्हटले होते. तसेच यासाठी 1000 रुपयांचा दंडही ठोठावला जाईल असे सांगण्यात आले होते. सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड ची गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. त्यामुळे आता या नवीन तारखेच्या आत तुम्ही पॅनकार्ड आणि आधार लिंक करणे गरजेचे आहे.

Previous articlePhoto Gallery | नागपुर के साथ विदर्भ में तमाम जगहों पर बारिश का खूबसूरत नजारा, सामने आईं तस्वीरें
Next articleMHT CET Exam | जानिए कब होगी महाराष्ट्र में सीईटी परीक्षा, उच्च एवं तकनीकी शिक्षा मंत्री ने दी ये जानकारी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).