Home Photo Gallery Photo News । ‘आयुष्य एक सुंदर नृत्य आहे…’ म्हणत रुबीना दिलैकनं शेअर...

Photo News । ‘आयुष्य एक सुंदर नृत्य आहे…’ म्हणत रुबीना दिलैकनं शेअर केलं फोटोशूट

‘बिग बॉस 14’ ची विजेती आणि टेलिव्हिजन स्टार रुबीना दिलैकनं तिचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ज्यामध्ये ती डान्स मूव्ह्स करताना दिसत आहे. मुख्य म्हणजे रुबीना दिलैक नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी असेच सुंदर फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर करीत असते.

यावेळी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रुबीनानं सुंदर लेहेंगासह स्टाईलिश पेस्टल ब्लाउज परिधान केला आहे. या लेहेंग्यासोबत तिनं मखमली बूट्स कॅरी केले आहेत. फोटो शेअर करत रबीनानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘जीवन एक सुंदर नृत्य आहे.’

रुबीनाच्या या पोस्टला 4 लाखाहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. रुबीनाचा पती अभिनव शुक्ला सध्या केपटाऊनमध्ये आहे, तो स्टंट बेस्ड रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ च्या 11 व्या सीझनच्या शूटिंगमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here