Home Police Nagpur | अबब… जिवंत बॉम्ब घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला युवक

Nagpur | अबब… जिवंत बॉम्ब घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला युवक

यू ट्यूब पाहून बनविला बॉम्ब, बीडीडीएस च्या प्रयत्नामुळे बचावले

नागपूर ब्यूरो: शहरातील पोलीस ठाण्यात शनिवारी अचानक एक युवक जिवंत बॉम्ब घेऊन पोहोचला. त्याच्याजवळ बॉम्ब असल्याचे कळताच पोलिसांमध्ये एकच गोंधळ उडाला. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला बोलाविण्यात आले. बºयाच प्रयत्नानंतर तो बॉम्ब निकामी करण्यात आला.

नागपूर शहर पोलिस हद्दीतील नंदनवन पोलिस ठाण्यात शनिवारी ही घटना घडली. या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगरात राहुल युवराज पगाडे (२५) राहतो. युट्युब वर त्याने बॉम्ब कसा बनवायचा, याचे व्हिडिओ बघितले आणि तसेच करून त्याने स्वत: बॉम्ब बनविले सुद्धा.

निकामी करता आले नाही म्हणून पोलीस ठाणे गाठले

राहुल पगाडे या युवकाने युटयुब वर बॉम्ब बनविण्याचे व्हीडिओ बघून स्वत: देखिल बॉम्ब बनविले मात्र तो निकामी कसा करायचा हे त्याला माहित नव्हते. बॉम्बचा स्फोट होऊन आपला प्रसंगी जीव जाऊ शकतो, याची कल्पना आल्याने तो तात्काळ बॅगमध्ये जिवंत बॉम्ब घेवून नंदनवन पोलिस ठाण्यात पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here