mhtcet2021.mahacet org या वेबसाईटवर भरा अर्ज
मुंबई ब्युरो : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून राज्यात सध्या अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील.
अर्जनोंदणीला 8 जूनपासून सुरुवात
अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी 8 जूनपासून अर्जाची नोंदणी सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठीचा शेवटाचा दिवस हा 7 जुलै 2021 असेल. तशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली आहे. अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांना https://mhtcet2021.mahacet.org या लिंकला भेट द्यावी लागेल.
अर्ज कसा कसा करावा ?
- MHT CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mhtcet2021.mahacet.org. या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यासाठी MHT CET 2021 registration येथे क्लिक करा
- त्यानंतर सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थित भरा आणि सेव्ह वर क्लिक करा.
- MHT CET 2021 application form भरण्यासाठी अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
- त्यानंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन पद्धतीने भरून सबमीट या बटणावर क्लिक करा.
- तुम्ही भरलेल्या अर्जाची एक प्रिटं काढून घ्या..