प्रशासनाकडून स्टेज 3 नुसार अनलॉकबाबत नवीन आदेश जारी
गडचिरोली ब्युरो : शासन निर्देशाप्रमाणे कोविड – 19 साथरोग संदर्भाने “ब्रेक द चैन अंतर्गत निर्धारित प्रतिबंधात्मक पातळी” अंतर्गत गडचिरोली जिल्हा हा पातळी-3 मध्ये मोडत असून शासन आदेशानुसार वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधित बाबींना जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नवीन नियमावली आणि उपाययोजना कालावधी, सोमवार दि. 07 जुन 2021 चे सकाळी 07.00 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.
- ▪️अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने ही सोमवार ते रविवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.
- ▪️अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने ही सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.
- ▪️रेस्टॉरेन्ट, उपहारगृह- सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत 50% डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. इतर वेळेस पार्सल/होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल.
- ▪️सार्वजनिक स्थळे, खुले मैदान इ.- सार्वजनिक स्थळे, खुले प्रेक्षागृह, मॉर्निंग वॉक, सायकलिंग हे सर्व दिवस सकाळी 5.00 ते 9.00 वाजेपर्यंत सुरु असेल.
- ▪️खाजगी कार्यालये हे सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.
- ▪️खाजगी/शासकीय कार्यालयातील उपस्थिती- 50% उपस्थितीसह सुरु ठेवता येईल.
- ▪️सामाजिक/सांस्कृतिक/मनोरंजन इ. ठिकाणची गर्दीबाबत- सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून 50 लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल.
- ▪️विवाह कार्यक्रम- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. तथापि याचे उल्लंघन केल्यास रु. 50000/- दंड व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
- ▪️अंत्यविधी- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून एकूण 20 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.
- ▪️स्था.स्व.संस्था व सहकारी संस्था यांचे बैठका व निवडणुकाबाबत- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून 50 लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल.
- ▪️बांधकाम-सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत प्रत्यक्ष बांधकामस्थळावर कामास मुभा असेल परंतु कामगारांना दुपारी 4 वाजेनंतर काम करण्याची परवानगी नसेल.
- ▪️कृषी विषयक सेवा, दुकाने- सोमवार ते रविवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सुरू ठेवण्याची मुभा असेल.
- ▪️व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स इ.- सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर ठिकाणांमध्ये एसी चा वापर करता येणार नाही.
रामाजीगुडम आणि रामांजापूर गाव कोरोना मुक्त
सिरोंचा तालुक्यातील रामांजापूर व रामाजीगुडम हे गाव 70 टक्के कोरोणा बाधित होते लसीकरण, वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या नेतृत्वात प्रशासनाने हे गाव कोरोना मुक्त केलेले आहे. आता हे गाव कोरोना मुक्त झाल्याने ग्रामपंचायत स्थळावरुन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यास या गावांची तयारी दिसत आहे.