Home हिंदी गणेशोत्सव 2020 : गणपती बाप्पा मोरया ने लाडक्या बाप्पाचे आगमन

गणेशोत्सव 2020 : गणपती बाप्पा मोरया ने लाडक्या बाप्पाचे आगमन

503

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात घरोघरी शनिवार ला गणरायाचे आगमन झाले. गणरायाचे आगमन होताच विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे.गेल्याकाही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेला पावसाचा जोर शुक्रवारी आणि आजही सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी बाप्पाच्या तयारीसाठीचे सामान खरेदी केली. अनेकांनी शुक्रवारी रात्रीच तर काहींनी शनिवार च्या सकाळी च बाप्पा घरी आणला आणि सकाळी विधीवत प्रतिष्ठापना, पूजा केली.

 

नागपूरच्या कोराडीत भाजपचे प्रदेश महासचिव व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची दुपारी उत्साहात स्थापना करण्यात आली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री गणेशाची पूजा व आरती केली. यावेळीं मुलगा संकेत बावनकुळे, मुलगी सौ पायल व जावई लोकेश आष्टनकर प्रामुख्याने उपस्थित होते.

केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी (नागपुरात) श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. ना. गडकरी यांचे चिरंजीव सारंग गडकरी यांनी गणेशाची स्थापना करून विधिवत पूजा केली. याप्रसंगी सौ. कांचन गडकरी, मुलगा सारंग गडकरी, स्नुषा ऋतुजा निखिल गडकरी, मधुरा सारंग गडकरी, नातवंडे निनाद, अर्जुन, सानवी व नंदिनी गडकरी उपस्थित होते. गणेश चतुर्थीनिर्मित्त ना. गडकरी यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या.

गणेश पूजन करतांना नितीन गडकरी, कांचन गडकरी, सारंग गडकरी, ऋतुजा निखिल गडकरी, मधुरा सारंग गडकरी, नातवंडे निनाद, अर्जुन, सानवी व नंदिनी गडकरी.
Previous articleखेल पुरस्कार : रोहित शर्मा बने खेल रत्न, राष्ट्रपति करेंगे सम्मानित
Next articleतबलीगी जमात को बनाया गया “बलि का बकरा” : हाईकोर्ट की टिप्पणी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).