Home Health Inspiration । डॉक्टर नूरी परवीन कोरोनाकाळातही 10 रुपयात करते रुग्णांवर उपचार

Inspiration । डॉक्टर नूरी परवीन कोरोनाकाळातही 10 रुपयात करते रुग्णांवर उपचार

विजयवाडा ब्युरो : कोरोनाच्या या अभूतपूर्व प्रतिकूल आणि संकटाच्या काळात विविध रूपं आपल्याला पाहायला मिळाली. अनेक डॉक्टर्स देवदूत बनून समोर आले. तर काही डॉक्टरांनी या साथीच्या काळातही लोकांकडून भरपूर पैसे उकळले.

आंध्रप्रदेशातील कडपा येथील डॉक्टर नूरी परवीन माणुसकी जपणाऱ्या डॉक्टरांपैकी एक ठरली. नूरी आपल्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या रूग्णांना तपासायचे केवळ 10 रुपये शुल्क घेते तर तीच्या क्लिनिकमध्ये दाखल झाल्यानंतर बेडची किंमत दिवसाला 50 रुपये आहे. नूरी परवीन विजयवाड्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मली-वाढलेली आहे. तिनं फतिमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कडपा इथून एमबीबीएस केलं आहे.

डॉक्टर नूरी सांगते, की कडपा वसाहतीतील गरिबांची मदत करण्यासाठी मी हा दवाखाना उघडला. मी माझ्या पालकांना घरी न कळवता क्लिनिक सुरू केलं. जेव्हा त्यांना माझे काम आणि नाममात्र शुल्क आकारण्याच्या निर्णयाबद्दल कळलं तेव्हा त्यांना कमालीचा आनंद झाला. त्यांनी मला आशिर्वाददेखील दिला. नूरी परवीन अशा कुटुंबातली आहे जिथं तिच्या पालकांनी तीन अनाथ मुलांना दत्तक घेऊन वाढवलं आहे. सोबतच त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही उचलला आहे. नुरीला ‘कडपाची मदर टेरेसा’ म्हणतात.

नूरीने 7 फेब्रुवारी 2020 ला कडपा इथं क्लिनिक उघडलं. पण जेव्हा कोरोनाच्या साथीचा आजार आला तेव्हा तिनं लोकांच्या सांगण्यावरून दवाखाना काही काळ बंद करण्याचं ठरवलं. मात्र दवाखाना बंद करून तीन-चार दिवस झाले आणि आपण डॉक्टर आहोत आणि लोकाचे प्राण वाचवणे आपले कर्तव्य आहे याची तिला जाणीव झाली. त्यानंतर तिनं आपला दवाखाना पुन्हा सुरू केला जो आता 24 तास सुरू असतो.

इतकंच नाही, तर तिनं आपल्या दिवंगत आजोबांच्या स्मृती जपण्यासाठी ‘नूर चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापनाही केली आहे. याअंतर्गत ती आत्महत्या रोखण्यासह हुंडा प्रवृत्तीविरूद्ध लोकांना जागरूक करण्यासाठी डॉक्यूमेंट्रीज बनवते.

Previous articleRafale | फ्रांस से तीन और राफेल बिना रुके सीधे पहुंचे भारत, देश में अब हुए 14 राफेल
Next articleSupreme Court | कहा- किराएदार अपने आपको मकान मालिक न समझें
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).