Home हिंदी टेक नॉलेज : व्हाट्सएप्प च्या माध्यमातून करा एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ...

टेक नॉलेज : व्हाट्सएप्प च्या माध्यमातून करा एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल

545
तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या आणि फेसबुक कंपनीचे इस्टंट मेसेजिंग फ्लॅटफॉर्म व्हाट्सएप्प आपल्या युझर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. याचदरम्यान फेसबुकने आपल्या युझर्ससाठी काही दिवसांपूर्वी Messenger Rooms फीचर आणले होते. 50 लोकांसोबत या विशेष फिचरच्या माध्यमातून ग्रुप व्हिडीओ करणे सहज शक्य झाले आहे. त्यानंतर हे फिचर कंपनीने आता इंस्टाग्राम आणि व्हाट्सएप्प युजर्ससाठीही उपलब्ध करुन दिले आहे.

 

कोरोनाच्या संकट काळात सध्या प्रत्येकजण वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच सध्या मोठ्या प्रमाणात अनेक नोकरदार, विद्यार्थी आणि शिक्षक अनेक वेगवेगळ्या एप्स चा आधार घेत आहे. अशातच फेसबुकने उपलब्ध करून दिलेले हे फिचर यासाठी फायदेशीर ठरू शकते. युजर्सकडे WhatsApp Messenger Room हे फिचर वापरण्यासाठी लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर फेसबुक मेसेंजरचेही अपडेटेड व्हर्जन असणे गरजेचे आहे.

 

व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा :

  1. सर्वात आधी WhatsApp ओपन करून कॉल करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा
  2. त्यानंतर Create a room ऑप्शनवर क्लिक करा.
  3. Continue in Messenger ऑप्शन वर क्लिक करताच, मेसेंजर ऍप्प लिंक ओपन होईल.
  4. आता Try it, when prompted वर क्लिक करा.
  5. त्यानंतर Create Room वर क्लिक करा आणि रुमला एक नाव द्या.
  6. आता Send Link on WhatsApp वर क्लिक करा. यामुळे व्हाट्सएप्प पुन्हा ओपन होईल.
  7. आता या रूमची लिंक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुप्समध्ये शेअर करा.
  8. WhatsApp वर Rooms जॉईन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

WhatsApp वर आलेल्या रूम लिंकवर क्लिक करा.

  1. मेसेंजर ऍप्प किंवा वेबसाइटवर ही लिंक ओपन होईल.
  2. आता रूम जॉईन केल्यावरच 50 लोकांना तुम्ही व्हिडीओ किंवा ऑडियो कॉल करू शकतात.
Previous articleवायरल : झोपड़ी में तेंदुए ने दिया बच्चों को जन्म, वीडियो की सोशल मीडिया में धूम
Next articleगुड न्यूज : 3 सप्टेंबरपासून पुन्हा रस्त्यावर धावणार पुण्याची ‘लाईफलाईन’
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).