Home Finance Small Saving । बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय केंद्र सरकारकडून मागे

Small Saving । बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय केंद्र सरकारकडून मागे

नवी दिल्ली ब्युरो : छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. रात्री उशीरा माहिती समोर आली होती की, आर्थिक वर्ष 2020-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले आहे. पण आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. तो आदेश नजर चुकीने निघाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

बचत खात्यांवरील व्याजदरात 0.5% कपात करण्यात आली होती. त्यामुळ व्यादर 4.0% वरून 3.5% वर येणार होता, मात्र आता तो 4 टक्केच राहणार आहे. सुकन्या समृद्धि खाते योजने अंतर्गत उपलब्ध व्याजदर 7.6% टक्केच राहणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याज दर 6.8 टक्केच राहणार आहे.

पीपीएफ योजनेवरील व्याजदर सध्या जो आहे तोच 7.1 टक्के राहणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.4 टक्के कायम राहणार आहे. तसेच किसान विकास पत्राचा व्याज दर कमी होणार नाही.

व्याजात सर्वाधिक 1.1 टक्के कपात एक वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दोन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज 0.5 टक्क्यांनी कमी करून 5 टक्के, तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज 0.4 टक्क्यांनी कमी केलं होतं, तर पाच वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज 0.9 टक्के कमी करुन ते 5.8 टक्के करण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here