Home Maharashtra Amravati | समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना 37व्या दीक्षांत समारंभात डि.लीट. देणार

Amravati | समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना 37व्या दीक्षांत समारंभात डि.लीट. देणार

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेचा निर्णय

अमरावती ब्युरो : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची अधिसभा कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवारी आभासी पध्दतीने संपन्न झाली. या सभेमध्ये वझ्झर, अचलपूर येथील स्व अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह (अनाथालय) चे श्री शंकरबाबा पापळकर यांची डि.लीट मानद पदवीकरिता एकमताने निवड करण्यात आली.

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने समाजकार्यामध्ये बहुमूल्य योगदान देणारे श्री शंकरबाबा पापळकर यांना विद्यापीठाची मानद डि.लीट. देण्याचा निर्णय घेतला होता. संपन्न होणाऱ्या सदतिसाव्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांना ससन्मान डि.लीट मानद पदवी प्रदान केल्या जाणार आहे. श्री शंकरबाबा पापळकर यांचे अधिसभेमध्ये सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले.