Home Health NEET 2021 Exam। नीट परीक्षेची तारीख जाहीर, 1 ऑगस्टला होणार

NEET 2021 Exam। नीट परीक्षेची तारीख जाहीर, 1 ऑगस्टला होणार

मुंबई ब्युरो : मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट -2021′ (National Eligibility Cum Entrance Test) च्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. परीक्षा यंदा 1 ऑगस्टला होणार आहे. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.

NEET (UG) 2021 MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS या अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. इंग्रजी हिंदीसह 11 भाषेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 1 ऑगस्टला ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा, अभ्यासक्रम व अर्ज भरण्याबाबत माहिती नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. परीक्षेच्या अर्जाबाबत लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या अधिक माहितीसाठी https://nta.ac.in
https://ntaneet.nic.in/Ntaneet/Welcome.aspx

या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.

Previous articleNagpur | लगता है ये भीड़ ही कोरोना को कुचलकर मार डालेंगी
Next articleनंदा खरे । समाजाने मला भरपूर दिलं, त्यामुळे साहित्य अकादमी पुरस्कार मी नाकारतो
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).