Home Maharashtra Maharashtra। आ. परिणय फुके यांनी भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील तस्करी कड़े वेधले...

Maharashtra। आ. परिणय फुके यांनी भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील तस्करी कड़े वेधले शासनाचे लक्ष्य

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात गौण खनिज तस्करी व रेती तस्करीच्या तक्रारी आलेल्या आहेत. दोन्ही सभागृहांमध्ये सन्माननीय सदस्यांनी या विषयावर वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. करोडो रुपयांची महसूल बुडी या माध्यमातून महसूल विभागातून होत आहे. हजारो-करोडों रुपयांची रेती तस्करी, तसेच मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून होत आहे. विधानपरिषद सदस्य आ. डॉ. परिणय फुके यांनी  सभागृहात अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले.

एकट्या पवनीत आणि लाखांदूर तालुक्यात जवळपास 5 हजार पेटी रोजची दारुची तस्करी चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिथे दारु बंदीची जिल्हे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात होत आहे. सन्माननीय गृहमंत्री ज्या गोदिंया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या गोंदिया जिल्ह्यामध्ये अर्जुनीमोरगाव तालुक्यांमधून रोजच्या जवळपास 4 ते 5 हजार पेट्या दारु तस्करी करुन गडचिरोली जिल्ह्यात जात आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रेती चोरी, दारु तस्करी असे अवैध उद्योग भंडारा, गोंदिया जिल्ह्यात होत आहेत.

डॉ.   फुके म्हणाले,  2 दिवसांपूर्वी रेती तस्करांनी पोलिस चौकी जाळून टाकली आणि अद्याप त्यावर काही कारवाई झाली नाही. या गुन्ह्यात एका निर्दोष शेतकऱ्याला पकडण्यात आले आहे आणि पोलिसांचे म्हणणे आहे कि त्या शेतकऱ्याने आम्हांला गुन्हा कबूल केल्याचे लेखी लिहून दिले आहे. पोलिसांच्या दबाबाखाली जिथे मोठ-मोठे दरोडेखोर जर फुटतात तर मग साधा एक शेतकरी का बरं लिहून देणार नाही? त्यामुळे या रेती आणि दारु तस्करांवर कारवाई होणे गरजेचे आहे. अशी मागणी डॉ. फूके यांनी यावेळी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here