Home Maharashtra Maharashtra । आ. परिणय फुके यांची फ्रंट फुट वर “फलंदाजी”

Maharashtra । आ. परिणय फुके यांची फ्रंट फुट वर “फलंदाजी”

सरकारच्या एकूणच कार्यप्रणाली ला घेऊन धारे वर धरले

गोंदिया – भंडारा जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी मंगळवारला सरकारचा खरपुन समाचार घेतला होता. बुधवारी विधानमंडलात राज्यपालाच्या अभिभाषणावर आपले विचार मांडतांना सुद्धा त्यांची अशीच फ्रंट फुट वर “फलंदाजी” सुरु होती.


Video: आ. परिणय फुके यांची फलंदाजी ऐका..

 

यावेळी ते म्हणाले, मागील 5 वषार्पासून नागपूर महानगर पालिकेला वितरित करण्यात आलेल्या निधीचा लेखा-जोखा आज अधिवेशनात सादर तर करण्यात आला. पण एकूण किती आणि कधीपर्यंत हा निधी दिला जाणार? हा मूळ प्रश्न उपस्थित होतो.

हा निधी जर का प्राधान्य क्रमाने दिला जाणार असेल तर तो प्राधान्य क्रमांक काय? हे आधी स्पष्ट करावं. तसेच पुणे व ठाणे महानगर पालिकेला आपण किती निधी वितरित केला, हे देखील या माध्यमातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

आ. फुके म्हणाले, सरकारी कामाच्या दस्तावेजांमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, मागासवर्गीय, ओबीसी, अनुसूचित जाती-जमातीचे नागरिक, आदिवासी युवक, महिला अत्याचार आणि युवकांचे प्रश्न यासंदर्भात कुठे ही नाममात्र उल्लेख नाही, हे खेदाने सांगावेसे वाटते.

या अभिभाषणाच्या माध्यमातून सरकारने केवळ शेतकऱ्यांच्या ‘तोंडाला पानं पुसण्याचं’ काम केलं आहे. सरकार सामान्य नागरिकांसाठी काय करणार आहे? जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार की नाही? यावर अभिभाषणात तीळमात्र उल्लेख नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here