Home Maharashtra Maharashtra । सायबर हल्ल्या संबंधी खोटा अहवाल विधानमंडळात मांडू नये

Maharashtra । सायबर हल्ल्या संबंधी खोटा अहवाल विधानमंडळात मांडू नये

माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचना


नागपूर ब्यूरो : महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राउत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना सूचना केली आहे की त्यांनी चीन च्या सायबर हल्ल्याविषयीच्या अहवालाची तांत्रिक बाब तपासून बघितली पाहिजे. याशिवाय सदर अहवाल विधानमंडलात मांडू नये.

बावनकुळे म्हणतात, ऊर्जा खात्याच्या मानवी आणि मेकॅनिकल चुकीमुळे मुंबई चार तास, आठ तस, बारा तास थांबली. 12 ऑक्टोबरला संपूर्ण मुंबईला काळोखात जावं लागलं. ऊर्जा मंत्री, गृहमंत्री सायबर हल्ल्याच्या बाबी समोर आनत आहेत. केंद्राच्या ऊर्जा खात्यांनी कोणताही सायबर हल्ला नाही, ही मानवी आणि मेकॅनिकल त्रुटी आहे, असं घोषित केले आहे.

 

ऊर्जा मंत्री आणि गृह मंत्र्यांनी आधी तांत्रिक बाबी तपासून घेतल्या पाहिजे. सायबर हल्ला झाला आहे असा खोटा आणि चुकीचा अहवाल विधानमंडळात मांडू नये अशी त्यांना माझी सूचना आहे. मुख्य म्हणजे त्यांनी या संबंधात सोशल मीडिया मध्ये ट्वीट सुद्धा केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here