Home Maharashtra Maharashtra | आ. परिणय फुके यांनी रेतीच्या मुद्दयावर मंत्र्यांना धारेवर धरले

Maharashtra | आ. परिणय फुके यांनी रेतीच्या मुद्दयावर मंत्र्यांना धारेवर धरले

भंडारा जिल्ह्यात 1000 कोटी रुपयांची रेती चोरी होत असल्याचा आरोप

विदर्भातील भंडारा – गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी रेती च्या मुद्दयावर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत त्यांना धारेवर धरले आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या प्रसंगी विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतांना दिसून येत आहेत.

आ. परिणय फुके यांनी म्हटले आहे की, मंत्री महोदयांनी रेती चोरी प्रकरणात दिलेली उत्तरे चुकीची आहेत, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. एका तालुक्यातून रोज 500 ट्रक रेती चोरी होते, या संदर्भात मी संबधित अधिकाºयांना 10 पत्रे पाठविलीत, पण यांवर कोणतेही उत्तर किंवा कारवाई झाली नाही. उलट संबधित वरिष्ठ अधिकारीच खाजगीत म्हणतात, ‘राजाच चोर आहे, तर चौकीदार काय करणार?’

आ. फुके यांच्या मते तुमसर तालुक्यात दरवर्षी जवळपास 50 कोटी रुपयांची रेती चोरी होते, तर संपूर्ण जिल्ह्यात जवळपास 1000 कोटी रुपयांची रेती चोरी होते. मोठ्या प्रकरणात तक्रारी आल्या असताना फक्त 3 प्रकरणांवर कारवाई का? असा प्रश्न देखिल त्यांनी विचारला आहे. या विरोधात 2 विधानसभा आमदार उपोषणाला बसले असताना ही अशा प्रकरणांवर शासनाकडून काही ठोस उपाय का केले जात नाहीत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here