Home Maharashtra शिवजयंती | सोलापूरमध्ये अर्ध्या एकर शेतात साकारली शिवरायांची प्रतिमा

शिवजयंती | सोलापूरमध्ये अर्ध्या एकर शेतात साकारली शिवरायांची प्रतिमा

374
0

सोलापुर ब्यूरो : शिवजयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील बाळे परिसरात प्रतीक तांदळे या तरुणाने शिवाजी महाराजांची 150 फूट प्रतिमा आपल्या शेतात तयार केली आहे. शेतातील ज्वारीच्या कडब्याचा वापर करून अर्ध्या एकर शेतात महाराजांची भव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली आहे. लोकआस्था युथ फाउंडेशन यांच्या संयोजनाने जवळपास दहा दिवसात ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.

दुसरीकडे सोलापुरातील एका मुस्लिम युवकाने देखील महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. सोलापुरातील चिरागअली सोशल फाउंडेशनचे अय्युब पठाण यांच्यावतीने दयानंद महाविद्यालयात महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. 15 फूट बाय 40 फुटांची ही रांगोळी साकारण्यात आली आहे. जवळपास आठ ते दहा दिवसांचा कालावधी या साठी लागल्याची माहिती अय्युब पठाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here