Home Health Maharashtra । राज्याचे जल संपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह

Maharashtra । राज्याचे जल संपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह

668
नागपूर ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः समाज माध्यमात ही माहिती शेयर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडिया मध्ये एक मेसेज टाकून म्हटले आहे कि “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.”

व्हर्च्युअली करणार कामकाज

जयंत पाटील आपल्या सोशल मीडियातील मेसेज मध्ये म्हणतात कि “जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे.”