Home Maharashtra आत्मनिर्भर | प्लास्टिक कपला बिस्किट कपचा पर्याय देणारे ‘थ्री इडियट्स’

आत्मनिर्भर | प्लास्टिक कपला बिस्किट कपचा पर्याय देणारे ‘थ्री इडियट्स’

767

कोल्हापूर ब्युरो : घराबाहेर चहा, कॉपी प्यायला गेल्यास प्लास्टिक किंवा कागदी कपमध्ये चहा, कॉफी दिली जाते. मात्र प्लास्टिकचं वाढतं प्रमाण पर्यावरणासाठी घातक आहे. म्हणून प्लास्टिक आपल्या रोजच्या वापरातून कसं टाळता येईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. असाच एक प्रयोग कोल्हापुरातील सुशिक्षित तरुणांची केला आहे. चहा, कॉफीसाठी प्लास्टिक किंवा कागदी कपाऐवजी बिस्किट कपचा पर्याय या तरुणांनी दिला आहे.

दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर अशी या प्रयोगशील तरुणांची नावं आहेत. या तिघांचंही इंजिनीअररिंगचं शिक्षण पूर्ण झालं आहे. काहीतरी वेगळं समाज उपयोगी काम करावं या विचारांतून त्यांना या बिस्किट कपची कल्पना सुचली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक कपला पर्याय म्हणून चहा, कॉफी वगैरे पेय घेतल्यानंतर होणारा कचरा टाळण्यासाठी कागदी व प्लास्टिक कपला पर्याय त्यांनी शोधला आहे. म्हणूनच कोल्हापूरमध्ये प्रथमच खाण्यायोग्य बिस्कीट कप बनवण्यात आले आहेत.

मॅग्नेट एडिबल कटलरी’ या ब्रँड मार्फत सुरुवात

दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तीन इंजिनिअर युवकांनी सुरु केलेल्या ‘मॅग्नेट एडिबल कटलरी’ या ब्रँड मार्फत हे बिस्किट कप उपलब्ध करण्यात आले आहेत. मैद्यापासून बनवण्यात आलेले हे बिस्किट कप आपण काही पेय घेतल्यानंतर चवीने खाऊ शकतो. काही कारणाने नाही खाऊ शकलो तर आपण इतरत्र फेकले तरी भटकी जनावरे ते खाऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच त्यांचीही भूक भागवण्याचे काम होते. हे कप ‘झिरो वेस्ट’ या तत्वावर हे तयार करण्यात येतात.

प्लेट्स, बाउल्स विकसित करण्याचं काम सुरु

विशेष म्हणजे अभियांत्रिकीचे विद्यार्थी असल्याने त्यांनी स्वतः डिझाइन्स करून यासाठी लागणारी मशिन्स कोल्हापुरातच बनवली आहेत. यापुढे खाण्यायोग्य प्लेट्स, बाउल्स आदी प्रोडक्टस विकसित करण्यासाठीचे त्यांचे काम सुरु आहे. दिग्विजय, आदेश आणि राजेश यांनी सुरु केलेल्या या पर्यावरणपूर्वक कपचा वापर आपण सर्वांनी करायला हवा. जेणेकरुन पर्यावरणाचं रक्षण होईल पुढची पीढी सुरक्षित राहील.

Previous articleस्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार : नाना पटोले
Next articleNagpur | प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी ने रमाई जयंती मनाई
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).