Home Maharashtra Maharashtra। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लोणार येथे आगमन

Maharashtra। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लोणार येथे आगमन

बुलडाणा ब्यूरो : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आज सकाळी 9.30 वाजता लोणार येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. येथील बाजार समिती समोरच्या मैदानावरील हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वागत केले. जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आ. संजय रायमूलकर,आ. संजय गायकवाड, लोणार नगराध्यक्ष पूनम पाटोळे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया तसेच विविध राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here