Home Education ऑनलाईन शिक्षणासाठी शाळेने बनवलेल्या व्हॉट्सअँप ग्रुपमधून बाहेर काढले,पालकांचे आंदोलन

ऑनलाईन शिक्षणासाठी शाळेने बनवलेल्या व्हॉट्सअँप ग्रुपमधून बाहेर काढले,पालकांचे आंदोलन

605

नागपूर ब्युरो : नागपूरच्या वर्धमान नगर परिसरातल्या स्वामी नारायण शाळेसमोर पालकांचे आंदोलन सुरु आहे. शाळेने फी च्या मुद्द्यावरून शेकडो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी बनवलेल्या व्हॉट्सअँप ग्रुप मधून बाहेर काढले.

या घटनेच्या नंतर आज सकाळपासून शेकडो पालक शाळेच्या मुख्य दारासमोर गोळा झाले असून शाळा त्यांना कोणतेही उत्तर देत नसल्याचे त्यांचे आरोप आहे.. आम्ही फी भरायला तयार आहोत, मात्र शाळा वर्षभर चालली नसल्याने शाळेने काही प्रमाणात फी कमी करावी अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, शाळेने ते केलेले नाही असा पालकांचा आरोप आहे.