Home Maharashtra Nagpur | शरजील उस्मानीचे वक्तव्य तपासल्या नंतरच कारवाई : गृहमंत्री

Nagpur | शरजील उस्मानीचे वक्तव्य तपासल्या नंतरच कारवाई : गृहमंत्री

676

नागपूर ब्युरो : पुण्यातील एल्गार परिषदेत बोलताना शरजील उस्मानी याने हिंदु समाजाबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य तपासल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देेशमुख यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली.

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्माने याने हिंदु समाज सडला आहे, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या संदर्भात विचारले असता त्याच्या भाषणाचा व्हिडीओ बोलावला आहे. त्याची रितसर तपासणी करू. त्या नंतर काही आक्षेपार्ह आढळले तर कारवाई करू, असे देशमुख म्हणाले. राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्याचा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच होईल, असेही ते म्हणाले.