Home हिंदी मराठी सण : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा

मराठी सण : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा

962
शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. पोळा हा सण विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातही हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.

बैलांचा साजशृंगार महत्वाचा

पोळा सणाचा शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात. बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ म्हणजेच पोळा सणाची गीते म्हणायची पद्धत आहे. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. करोना संकटामुळे मिरवणुका काढता आल्या नाहीत, तरी शेतकरी वर्ग घरच्या घरी हा सण साजरा करतील, यात शंका नाही.

Previous articleVideo: See the C-60’s Shaurya Geet, you salute Gadchiroli police
Next articleएम्स में भर्ती हुए गृहमंत्री अमित शाह, थकान-बदनदर्द की थी शिकायत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).