Home Maharashtra Balasaheb Thackeray । बाळासाहेबांची जयंती, पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण, सर्वपक्षीय दिग्गजांची उपस्थिती

Balasaheb Thackeray । बाळासाहेबांची जयंती, पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण, सर्वपक्षीय दिग्गजांची उपस्थिती

680

मुंबई ब्युरो : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी 6 वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट येथे होणार आहे.

याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन होणार आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतराचे पालन या कोविड 19 मार्गदर्शक बाबींचे कृपया योग्यरित्या पालन करावे, असं सांगण्यात आलं आहे.

कार्यक्रमाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह महानगरपालिकेतील विविध पदाधिकारी, स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार रामदास कदम, आमदार भाई जगताप, स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांच्यासह महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.