Home Maharashtra Nagpur | जिल्ह्यात 127 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान

Nagpur | जिल्ह्यात 127 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान

628

नागपूर ब्यूरो : जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतीमध्ये आज निवडणूक होणार आहे. एकूण 130 नियोजित ग्रामपंचायतीपैकी सोनपूर (कळमेश्वर) व जटामखोरा (सावनेर) या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने व देवळी कलाल (कुही) या गावाची निवडणूक स्थगित झाल्याने आता 127 ग्रामपंचायतीमध्ये उद्या प्रत्यक्ष मतदान होईल.

जिल्ह्यातील 485 मतदान केंद्रावर एकूण 3015 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. निवडणुकीसाठी 13 तालुक्यात 485 मतदान केंद्रावर एकूण 1455 मतदान अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रनिहाय अध्यक्ष असे एकूण 485 केंद्र प्रमुख व मतदान केंद्र अधिकारी यांचा समावेश असेल. 127 ग्रामपंचायतीच्या 431 एकूण प्रभागापैकी 411 प्रभागात मतदान होणार आहे. 1196 एकूण जागांपैकी 1086 जागांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

या निवडणुकीची 11 डिसेंबर 2020 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. 13 तालुक्यांमध्ये तहसीलदारांमार्फत निवडणुकीचा कार्यक्रम जारी केलेला आहे. त्यानुसार आता निवडणूक प्रत्यक्ष उद्या दिनांक 15 जानेवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे.

काटोल तालुक्यात 3 ग्रामपंचायतीच्या 9 प्रभागामध्ये 23 जागासाठी मतदान होईल. नरखेड तालुक्यात 17 ग्रामपंचायतीच्या 55 प्रभागामध्ये प्रत्यक्ष 54 प्रभागात 133 जागासाठी मतदान होईल. सावनेर तालुक्यात 11 ग्रामपंचायतीच्या 38 प्रभागामध्ये 96 जागासाठी मतदान होईल. कळमेश्वर तालुक्यात 5 ग्रामपंचायतीच्या 13 प्रभागामध्ये 37 जागासाठी मतदान होईल. रामटेक तालुक्यात 9 ग्रामपंचायतीच्या 32 प्रभागामध्ये 82 जागासाठी 31 प्रभागामध्ये मतदान होईल. पारशिवनी तालुक्यात 10 ग्रामपंचायतीच्या 31 प्रभागामध्ये 80 जागासाठी मतदान होईल. मौदा तालुक्यात 7 ग्रामपंचायतीच्या 31 प्रभागामध्ये 58 जागासाठी 20 प्रभागात प्रत्यक्ष मतदान होणार आहे.कामठी 9 ग्रामपंचायतीच्या 31 प्रभागामध्ये 85 जागासाठी 31 प्रभागात प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

उमरेड 14 ग्रामपंचायतीच्या 43 प्रभागामध्ये 94 जागासाठी 39 प्रभागात प्रत्यक्ष मतदान होणार आहे. भिवापूर 3 ग्रामपंचायतीच्या 9 प्रभागामध्ये 27 जागासाठी 9 प्रभागात प्रत्यक्ष मतदान होणार आहे. कुही तालुक्यात 25 ग्रामपंचायतीच्या 78 प्रभागामध्ये 186 जागासाठी 72 प्रभागात प्रत्यक्ष मतदान होणार आहे. नागपूर ग्रामीणमधील 11 ग्रामपंचायतीच्या 47 प्रभागामध्ये 132 जागासाठी 47 प्रभागात प्रत्यक्ष मतदान होणार आहे. हिंगणा तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीच्या 17 प्रभागामध्ये 59 जागासाठी मतदान होईल.

मतदानासाठी आवश्यक साहित्यासह निवडणुकीसाठी पोलिंग पार्टी आज रवाना झाली आहे. जिल्ह्यात संवेदनशील केंद्र नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी दिली आहे. मतमोजणी 18 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपासून तालुकास्तरावर होईल. याच ठिकाणी मतदानाचा निकाल जाहीर केल्या जाईल. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार कोविड प्रतिबंधात्मक सुरक्षा उपायांचे पालन करून मतदान प्रक्रिया राबविली जाईल. तहसीलदार व तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेद्वारे कोविड सुरक्षा उपाययोजना करणार आहेत.

Previous articleNagpur | उपमहापौरांनी केली पाचपावली सुतिकागृहाची आकस्मिक पाहणी
Next articleResearch | डेंगू वायरस को फैलने से रोकने में मददगार एंटीबॉडी की खोज
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).