Home मराठी Nagpur Bulletine | देवदर्शनाला जाणाऱ्या युवकांच्या वाहनाला अपघात, चार ठार

Nagpur Bulletine | देवदर्शनाला जाणाऱ्या युवकांच्या वाहनाला अपघात, चार ठार

724
गणपती पुळे येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या युवकांची बोलेरो गाडी उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून चार युवकांचा मृत्यू झालाय या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वर्ध्या जिल्ह्यातील हिंगणघाट येथे राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीपुढे हा अपघात झाला.

उमरेड तालुक्यातील हिवरा हिवरी येथील हे नवयुवक देवदर्शनासाठी म्हणून गणपती पुळेसाठी सायंकाळी घरून निघाले होते. हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावरून खाली उतरताना MH 32 KR 6482 क्रमांकाची भरधाव बोलेरो गाडी रस्त्यावर बंद स्थितीत असलेल्या MH 29 T 1009 क्रमांकाच्या ट्रकवर धडकली. अपघातात चालक शैलेश पंढरी गिरसावळे, आदर्श हरीभाऊ कोल्हे, सूरज जनार्दन पाल आणि मोहन राजेंद्र मोंढे यांचा मृत्यू झाला. जखमींची नावे यश कोल्हे, भूषण राजेंद्र खोंडे, शुभम प्रमोद पाल, प्रणय दिवाकर कोल्हे, समीर अरुण मोंढे अशी आहेत


वेकोली मुख्यालयावर आ. जोरगेवार यांच्या नेतृत्वात मोर्चा

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या नागपुरातील मुख्यालयावर बेरोजगार तरुणांचा मोठा मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या मुख्यालयाच्या दारावर मोर्चा अडवला. मोर्चा अडवल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. खाणींमध्ये स्थानिक तरुणांना कामगार म्हणून रोजगार मिळावा आणि 2018 पासून बंद केलेली कामगार भरती सुरू करावी तसंच परराज्यातील तरुणांना महाराष्ट्रातील खाणींमध्ये नोकरी देऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे.

Previous articleNagpur | मनपाचे 54वे महापौरपदी दयाशंकर तिवारी यांची निवड
Next articleराष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिली शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).