Home हिंदी Nagpur | पतीच्या वाईट सवयींमुळं डॉ. सुषमा यांनी आपलं कुटुंब संपवलं

Nagpur | पतीच्या वाईट सवयींमुळं डॉ. सुषमा यांनी आपलं कुटुंब संपवलं

784

नागपुरातील राणे कुटुंबियांच्या मृत्यू प्रकरणात पोलिस तपासानंतर धक्कादायक बाब आली समोर

  • महाराष्ट्राच्या उपराजधानी असलेल्या नागपूरसह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या राणे कुटुंबियांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी बुधवारी प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन याचा खुलासा केला आहे.
  • कौटुंबिक कलहामुळे डॉ. सुषमा राणे यांनीच त्यांचे पती प्रा. धीरज राणे आणि दोन्ही मुलांना विषाचे इंजेक्शन देऊन स्वतः गळफास घेतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

नागपूर ब्यूरो : नागपूरसह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या राणे कुटुंबियांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैयक्तिक आयुष्यातील नैराश्य, पतीच्या वाईट सवयी त्यामुळे होणाऱ्या कौटुंबिक कलहामुळे डॉ सुषमा राणे यांनी पती प्राध्यापक धीरज राणे आणि दोन्ही मुलांना आधी विषाचे इंजेक्शन दिले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

काय होती घटना?18 ऑगस्टच्या दुपारी कोराडी परिसरातील जगनाडे लेआऊटमधील राहत्या घरी राणे कुटुंब मृतावस्थेत आढळले होते. नामांकित महाविद्यालयात विभाग प्रमुख असलेले धीरज राणे, आणि डॉक्टर असलेल्या सुषमा राणे यांनी 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 5 वर्षीय मुलगी वण्यासोबत असा टोकाचा पाऊल का उचललं? असा प्रश्न सर्वांच्या पुढे निर्माण झाला होता. घटनेच्या वेळी प्रा धीरज राणे आणि दोन्ही मुले बेडरूम मध्ये मृतावस्थेत आढळले होते तर डॉ सुषमा राणे शेजारच्या खोलीत गळफास लावून होत्या. त्यामुळे चार जणांचा मृत्यू कसा आणि का झाला असा प्रश्न पोलिसांसमोर होता.

पती पत्नीचे संबंध चांगले नव्हते : फॉरेन्सिक पुरावे, घटनेच्या आधीच्या काही काळातील घटनाक्रम तसेच प्रा. धीरज आणि डॉ सुषमा यांच्या मोबाईल फोन्सचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी डॉ सुषमा यांनी पती आणि दोन्ही मुलांची आधी विषाचे इंजेक्शन देऊन हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास लावल्याचे निष्पन्न झाले आहे. राणे कुटुंबात पती पत्नीचे संबंध चांगले नव्हते. प्रा धीरज पत्नीवर संशयच घ्यायचे. त्यांची स्वतःची वर्तवणूक चांगली नव्हती. त्यांचा बाहेरख्यालीपणा, दारूचे अति व्यसन कुटुंबात कलहाचे प्रमुख कारण बनले होते.

रुग्णालयातून कुत्र्याला मारण्यासाठीचे इंजेक्शन मिळविले : दारूच्या आहारी गेल्यामुळे प्रा धीरज महाविद्यालयातही नियमितपणे जात नव्हते. कुटुंबाची अशी अवस्था पाहून डॉ सुषमा यांनी स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय केलाच त्याचवेळी दोन्ही मुलांना आणि पतीलाही संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या एक दिवसाआधी म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी त्यांनी स्वतः नोकरी करत असलेल्या रुग्णालयातून कुत्र्याला मारण्यासाठीचे इंजेक्शन मिळविले होते. त्यांच्या घरातला कुत्रा त्रास देत असल्याचे कारण सांगून डॉ सुषमा यांनी हे इंजेक्शन मिळविले होते. मात्र, त्यांनी त्या इंजेक्शनचा वापर स्वतःच्या कुटुंबियांवर केला. पती सह दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ सुषमा यांनी शेजारील खोलीत जाऊन गळफास घेतला होता.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).