Home हिंदी Nagpur। शहर युवासेना तर्फे मनपा आयुक्त राधाकृष्णन यांना निवेदन

Nagpur। शहर युवासेना तर्फे मनपा आयुक्त राधाकृष्णन यांना निवेदन

391
0

नागपूर ब्यूरो : युवासेना नागपूर शहर तर्फे महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांना युवासेना जिल्हा युवा अधिकारी हितेश यादव यांच्या मार्गदर्शन आणि युवासेना शहर सचिव गौरव गुप्ता यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी मनपा आयुक्तांना सांगितले आहे कि शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्ड च्या रस्त्यावर मोठे गाड्या जात असतांना त्यावर कचरा भरलेल्या गाड़ीवर ताडपतरी न झाकुन गाड्या नेत असतात. त्यामुळे प्रदूषण होते आणि तोच कचरा रस्त्यावर पडलेला असतो त्या मुळे कचरा संकलन करणाऱ्या B.V.G.कंपनी ला दंड कारावास व योग्य कार्यवाही करण्यात यावी. रस्ते खराब होत आहेत. रस्ते लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

या वेळी प्रामुख्याने युवासेना शहर प्रमुख अक्षय मेश्राम, उपजिलाधिकारी आकाश पांडे व निखिल शर्मा उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here