चंद्रपूर ब्यूरो : येत्या 22 नोव्हेंबर 2020 पासून नवजीवन एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवजीवन एक्सप्रेस पूर्ववत सुरू झाल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत सुविधाजनक असलेली नवजीवन एक्सप्रेस पूर्ववत सुरू व्हावी, अशी आग्रही मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली होती. या मागणीची दखल घेत 22 नोव्हेंबर 2020 पासून नवजीवन एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर नवजीवन एक्सप्रेस ही चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक उपयोगी आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस सुरू व्हावी या अनुषंगाने हंसराज अहीर यांच्याकडे निवेदने सादर करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेऊन अहीर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे विनंती केली होती. नवजीवन एक्सप्रेस सुरू होणार असल्याने हंसराज अहीर यांचे चंद्रपूर रेल्वे संघर्ष समितीतर्फे अभिनंदन आणि आभार मानण्यात आले आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).