Home हिंदी उच्च न्यायालयाच्या ई-रिसोर्स सेंटरचे नागपुरात 31 ऑक्टोबर ला उद्घाटन

उच्च न्यायालयाच्या ई-रिसोर्स सेंटरचे नागपुरात 31 ऑक्टोबर ला उद्घाटन

615

नागपूर ब्यूरो : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत ई-रिसोर्स सेंटरचे उद्घाटन भारताचे सर न्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भू्षण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता व न्यायमूर्तीसह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील.

उच्च न्यायालयाच्या सभागृहात सोमवार (26 ऑक्टोबर ) च्या सकाळी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी., उच्च न्यायालयाच्या प्रबंधक श्रीमती अंजू शेंडे, अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका राम जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भानुसे, भारत संचार निगमचे महाव्यवस्थापक  पानेकर, सहप्रबंधक पी. एस. जिकार उपस्थित होते.

सिव्हिल लाईन्स येथील न्यायिक अधिकारी प्रशिक्षण केंद्रात मुख्य ई-रिसोर्स सेंटर नियोजित आहे. या रिसोर्स केंद्रामधून सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाचे ई-फाईलिंग, ई- हिअरिंग करता येणार आहे. तसेच या केंद्रात न्यायिक प्रक्रियेच्या अनुषंगाने अन्य सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. अशा पद्धतीचे हे देशातील पहिले केंद्र असणार आहे. या उद्घाटनाचे लाईव्ह प्रसारण करण्यात येईल. कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन हा कार्यक्रम होणार आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).