Home हिंदी नागपूर न्यूज बुलेटिन : आईसीएमआर ने केला मागील कोरोना चाचणीचा डाटा अपलोड...

नागपूर न्यूज बुलेटिन : आईसीएमआर ने केला मागील कोरोना चाचणीचा डाटा अपलोड : मनपा आयुक्त

669

कोरोना रुग्णांच्या चाचणीचा मागील डाटा आई.सी.एस.आर.कडून त्यांच्या पोर्टलवर टाकण्याची प्रक्रीया पूर्ण झालेली आहे. आई.सी.एम.आर.कडून शहरातल्या 22258 चाचणीचा डाटा पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. याच्यात नागपूरचे 7433 कोरोना पॉजिटिव रुग्णांचा समाविष्ट आहे. आता हे रुग्ण कोरोना बाधित नसल्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, कोव्हीड – 19 ची चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त लेबॉरेटरीकडून चाचणी केलेल्या कोरोना रुग्णांची अद्यावत माहिती आई.सी.एम.आर.च्या पोर्टलवर टाकण्यात आली नव्हती. मनपाच्या निर्देशानंतर ही माहिती मागच्या काही दिवसापासून पोर्टल वर टाकण्यात आली असून मागील डाटा आता अपलोड केल्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्येमध्ये वाढ दिसत आहे.


मास्क न लावणा-या 288 नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (21 ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 288 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 44 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 13779 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 52,48,500/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 76, धरमपेठ झोन अंतर्गत 61, हनुमाननगर झोन अंतर्गत 39, धंतोली झोन अंतर्गत 12, नेहरुनगर झोन अंतर्गत 11, गांधीबाग झोन अंतर्गत 16, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 15, लकडगंज झोन अंतर्गत 8, आशीनगर झोन अंतर्गत 16, मंगळवारी झोन अंतर्गत 28 आणि मनपा मुख्यालयात 6 जणांविरुध्द बुधवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 8309 बेजबाबदार नागरिकांकडून रु 41 लक्ष 54 हजार 500 वसूल करण्यात आले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleआमदार विकास कुंभारे यांनी तिकीट काढून केला मेट्रोने प्रवास
Next articleसन्मान स्त्री शक्तीचा : वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मंगला केतकर यांचे योगदान अतुलनीय
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).