Home हिंदी महात्मा गांधींनी घातलेला चष्मा ब्रिटनमध्ये लिलावासाठी

महात्मा गांधींनी घातलेला चष्मा ब्रिटनमध्ये लिलावासाठी

554
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1900 साली हा चष्मा घातला होता.
  • त्यांनी हा चष्मा भेट म्हणून दिला. या चष्म्याची अंदाजे किंमत 9.79 ते 14.68 लाख रुपये आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी परिधान केलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा लिलाव ब्रिटनमध्ये होणार आहे. महात्मा गांधी यांनी 1900 साली हा चष्मा घातला होता. त्यानंतर त्यांनी हा चष्मा भेट म्हणून दिला. या चष्म्याची अंदाजे किंमत 9.79 ते 14.68 लाख रुपये आहे.

आमच्याकडील डाकपेटीत असलेल्या या चष्म्याचा एवढा सुवर्ण इतिहास असल्याचे समजल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटले. इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे गांधींजींचे हे चष्मे होते. या विक्रेत्याच्या काकांना महात्मा गांधींनी स्वत: हे चष्मे भेट दिले होते. ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करत असताना 1910-30 मध्ये गांधीजींनी त्यांना ही भेट दिली होती,असे लिलावकर्त्याने सांगितले.

दक्षिण-पश्चिम इंग्लंडच्या उपनगरातील हनहम स्थित ‘ईशान्य ब्रिस्टल ऑक्शन’ कंपनीने रविवारी सांगितले की, त्यांच्या पोस्टमध्ये असलेल्या चष्म्याच्यामागे इतका गौरवशाली इतिहास असू शकतो हे जाणून आम्हाला आश्चार्य वाटले.

Previous articleपुढचे तीन दिवस विदर्भ आणि कोकणात अलर्ट
Next articleपूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी की कोरोना रिपोर्ट पॉजिटिव, खुद ट्वीट कर दी जानकारी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).