Home हिंदी नागपुरात महिला अत्याचारांविरोधात भाजपचे आंदोलन

नागपुरात महिला अत्याचारांविरोधात भाजपचे आंदोलन

742

वाढत्या महिला अत्याचारांविरोधात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे शहरातील सहाही मंडळांमध्ये सोमवारी आक्रोश आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी शासनाच्या भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात त्वरित पावले उचलण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.

नागपूर ब्यूरो : दक्षिण पश्चिम नागपुरात प्रदेश महिला मोर्चा महामंत्री अश्विनी जिचकार यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. यावेळी माजी महापौर नंदा जिचकार, अनुसूया गुप्ता, वर्षा चौधरी, कल्पना तडस, वैशाली सोनुने, कल्याणी तेलंग, मनिषा काशीकर प्रामुख्याने उपस्थित होते. पूर्व नागपुरातील सतरंजीपुरा भागात आ.कृष्णा खोपडे व उपमहापौर मनिषा कोठे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यावेळी संजय अवचट, सिमा ढोमने,निशा भोयर, नंदा येवले, मनीषा ढोमने, चंदा मानवटकर गौरी शर्मा, मनीषा अतकरे, सन्तोष लड्ढा, स्मिता चकोले, उपस्थित होते.

उत्तर मंडळाअंतर्गत कमाल चौकात शहराध्यक्ष डॉ.किर्तीदा अजमेरा यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यावेळी लता येरखेड़े, मंगला गोतमारे, उषा किरण शर्मा, आशा गुप्ता, प्रवीण शेख, संध्या चौधरी, भाग्यश्री कानतोड़े, निरंजना पाटिल, दुर्गा हत्तीठेले,राधा तिवारी उपस्थित होते. पश्चिम नागपुरातील गिटट्टीखदान चौकात झालेल्या आंदोलनात संध्या ठाकरे, कल्पना पाझारे, रेखा दैने, वर्षा ठाकरे, संगीता गिर्हे, शिवाणी दाणी, प्रगति पाटिल,अर्चना गावडे,रेखा वाढे,राणी रेड्डी, नितु गुप्ता उपस्थित होते.

मध्य नागपुरातील आंदोलन प्रदेश सचिव अर्चना डेहनकर यांच्या नेतृत्वात चितार ओळी चौकात झाले. यावेळी श्रद्धा पाठक,वंदना यंगटवार,सरला नायक,विद्या कण्हेरे,,नेहा वाघमारे, गीता पार्डीकर, सरोज चव्हाण,उषा बेले उपस्थित होते. दक्षिण मंडळात झालेल्या आंदोलनात देवेंद्र दस्तुरे, निता ठाकरे, प्रीति राजदेरकर, उषा पायलेट, दिव्या धुरडे, रूपाली ठाकुर, भारती बूंदे, रीता मुळे यांची उपस्थिती होती.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articlePositive Story : बचपन में दोनों हाथ गंवाए, पैरों से कंप्यूटर चलाती हैं सरिता
Next articleनक्षलग्रस्त भागातील 21 युवकांना खासगी कंपनीत मिळवून दिली नोकरी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).