Home हिंदी महाराष्ट्र सायबरमध्ये तरुणांना इंटर्नशीपची सुवर्ण संधी,अर्ज करा

महाराष्ट्र सायबरमध्ये तरुणांना इंटर्नशीपची सुवर्ण संधी,अर्ज करा

505

मुंबई : आज सायबर गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. यालाच लक्षात घेऊन महाराष्ट्र सायबरमध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.cpaw-mah@gov.in या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे  12/08/2020 पर्यंत पाठवावा.

यासाठीचा पत्ता : The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005

इंटर्नशीपसाठी नियम, अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत

  • उमेदवारास संगणकीय तांत्रिक ज्ञान असावे व त्याचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. संभाषण व लेखन कौशल्य असावे.
  • इंटर्नशीपचा कालावधी 6 महिन्यांचा असेल. विहित कालावधी संपेपर्यंत उमेदवाराला इंटर्नशीप सोडता येणार नाही. (अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकारी यांची परवानगी आवश्यक)
  • महाराष्ट्र सायबरकडून उमेदवारास कोणताही भत्ता, प्रवास भत्ता देण्यात येणार नाही.
  • महाराष्ट्र सायबरच्या कार्यालयात उमेदवारास कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे लागेल.
  • महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयांसाठीचे गोपनियतेसंदर्भातील सर्व नियम व कायदे यांचे पालन उमेदवारास कसोशीने करावे लागेल.
  • कार्यालयीन कोणतेही विषय/माहिती यांचा गैरवापर करणे, फेरफार करणे, ताब्यात घेणे असे गैरप्रकार उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाहीत, असे महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेमार्फत कळविण्यात आले आहे.
Previous articleमनोरंजन : अन्वेषी जैन ने क्यों दी दिमाग का साइज बड़ा करने की सलाह?
Next articleरक्षा मंत्री राजनाथ सिंह आज करेंगे ‘आत्म निर्भर भारत सप्ताह’ की शुरुआत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).