Home हिंदी अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांनी वीर शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांनी वीर शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

449
0

गडचिरोली ब्यूरो : नक्षलवाद्यांच्या विरोधाला न जुमानता गुरुवार (दिनांक 8 ऑक्टोबर) रोजी सकाळी 9 वाजता गडचिरोली जिल्ह्याच्या पोलिस स्टेशन लाहेरी परिसरातील अतिदुर्गम भागातील मौजा मुरंगल येथील ग्रामस्थांनी एकत्र येत नक्षलवाद्यांच्या भ्याद हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. उल्लेखनीय आहे की 8 ऑक्टोबर 2009 रोजी लाहेरी – मल्लमपडूर रोडवर नक्षलांचे भ्याड हल्ल्यात जवान शहीद झाले होते.

पोस्टेचे प्रभारी अधिकारी महारूद्र परजने, पीएसआय सोनपितरे, झिजुर्डे, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट संतोष भोसले, पोलिस निरीक्षक शितलाप्रसाद व जवान यावेळी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करत वीर शहीद जवानांना मौन धारण करून श्रद्धांजली वाहिली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here