Home हिंदी सीटू व आशा वर्कर्स तर्फे भर पावसात जेलभरो आंदोलन

सीटू व आशा वर्कर्स तर्फे भर पावसात जेलभरो आंदोलन

नागपूर : केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, जनविरोधी धोरणांच्या विरोधात ९ आॅगस्ट ला जेलभरो आंदोलन पुकारले. संविधान चौक, नागपूर येथे सीटु तर्फे शेकडो आशा वर्कर्स जेलभरो आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. नागपुर जिल्ह्यात ६८ जागी सिटू तर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, रुपलता बोंबले, पौर्णिमा पाटील, कांचन बोरकर, अंजु चोपडे, शुभांगी चीचमलकर, पूनम दातीर यांनी केले. आंदोलनात शेकडो आशा वर्कर्स ह्या देशव्यापी आंदोलनात उपस्थित होत्या.