Home हिंदी नागपूर मनपाला ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान

नागपूर मनपाला ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान

868

पोर्णिमा दिनानिमित्त ‘अर्थ डे नेटवर्क’कडून सन्मान, आतापर्यंत 2 लाख 53 हजार 201 किलो कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण

 

नागपूर ब्यूरो : पोर्णिमा दिनानिमित्त नागपूरकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणा-या नागपूर महानगरपालिकेचा ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’कडून सन्मान करण्यात आला आहे. अर्थ डे नेटवर्क इंडिया’कडून ‘ऊर्जा बचत’ गटातील यंदाचा ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार नागपूर महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेने पोर्णिमा दिनी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू केलेल्या उपक्रमाची ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ने दखल घेतल्याने मनपाचा देशात नाव लौकीक झाला आहे. मनपाच्या या यशाबद्दल महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्य करणा-या सर्व स्वयंसेवकांचे व मनपा कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.

नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने 2014 पासून ऊर्जा बचतीच्या दृष्टीने पोर्णिमा दिवस हा विधायक उपक्रम तत्कालीन महापौर व आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हाती घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पोर्णिमेच्या प्रकाशात रात्री अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. त्याला प्रतिसाद देत नागरिकही या विधायक उपक्रमात सहभागी होतात. पोर्णिमेच्या रात्री ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक शहरातील विविध भागात फिरून नागरिकांना, व्यापाऱ्यांना अनावश्यक वीज दिवे रात्री 8 ते 9 या वेळात बंद करण्याचे आवाहन करतात. आतापर्यंत 2 लाख 53 हजार 201 किलो कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’मधून मनपाच्या पोर्णिमा दिन उपक्रमाचे कौतुक केले आहे.

विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी मनपाला स्वत: अर्ज न करता त्यासाठी शहरातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था किंवा शैक्षणिक संस्थाद्वारे नामांकन सादर करणे अनिवार्य होते. त्याअंतर्गत तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संचालक कौस्तभ चॅटजी व सुरभी जायस्वाल यांनी ऊर्जा बचत आणि हरीत आच्छादनाचा वाढता वापर या दोन श्रेणींमध्ये नागपूर महानगरपालिकेचा नामांकन प्रस्ताव दाखल केला होता. ग्रीन व्हिजील फाउंडेशनने प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूर महानगरपालिकेची बाजू मांडली. मनपाद्वारे सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती सुद्धा सादर केली. या सादरीकरणाच्या आधारे मनपाची ‘ऊर्जा बचत’ या श्रेणीतून निवड करीत ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्काराबद्दल ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’च्या भारतीय संचालक करुणा सिंग यांनी मनपाचे अभिनंदन केले व पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासंबंधी उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रत्येकांची जबाबदारी वाढली : महापौर संदीप जोशी

देशातील हिरवे शहर अशी ओळख असलेले आपल्या नागपूर शहराने पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. हिरवे शहर यासह ऊर्जा बचत करणारे शहर म्हणूनही आपल्या नागपूरने देशात छाप सोडली आहे. या यशामागे नागरिकांनी दाखविलेला पुढाकार, समंजसपणा आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांद्वारे करण्यात येणारी जनजागृतीची सुद्धा मोठी भूमिका आहे. या यशासह शहरातील नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleमनपाच्या मोबाइल वॅन द्वारे परसोडी येथील नागरिकांची कोव्हिड चाचणी
Next articleकोव्हिड संवाद : प्लाझ्मा दाते व्हा; इतरांचा जीव वाचवा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).