Home हिंदी कोझीकोड विमान अपघात : मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा मृत्यू

कोझीकोड विमान अपघात : मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा मृत्यू

कोझीकोड : केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वायूदलात विंग कमांडर असलेले कॅप्टन दीपक साठे यांनी 1981 ते 2003 या कालावधीमध्ये देशसेवा केली. वायूदलातून निवृत्त झाल्यानंतर दीपक साठ 2003 साली एयर इंडियामध्ये रुजू झाले. दीपक साठे हे मुंबईच्या पवईतील जलवायू विहार येथे राहत होते.

कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 123 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एयर इंडियाचं A737 बोईंग हे विमान रनवेवर घसरलं आणि दरीमध्ये गेलं.

आज संध्याकाळी लॅण्डिंगच्यावेळी करीपूर विमानतळावर ही दुर्घटना झाली आहे. याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत. हे विमान रनवेवर लॅण्डिंग केल्यावर दरीमध्ये कोसळलं, त्यामुळे विमानाचे दोन तुकडे झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. एनडीआरएफची टीम करीपूर विमानतळावर दाखल झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here