चीन विरोधात भारताने आक्रमकपणा घेतल्यानंतर अमेरिकाही अधिक आक्रमक झाली आहे. भारतानंतर अमेरिकेने चीनच्या TikTok वर बंदी घातली. आता गूगलने (Google) चीनला चांगला दणका दिला आहे. गूगलने चीनची 2500 पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा फटका बसणार आहे.
गूगलकडून सांगण्यात आले आहे की, चीनशी संबंधित 2500 पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केले आहेत. चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याचे कारण देत गूगलकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
गूगलने हटविलेले यूट्यूब चॅनेल्स स्पॅमी आणि बिगर राजकीय कंटेन्ट पोस्ट करत होते. तसेच, यामधील काही भाग राजकारणाशी संबंधित होता. दिशाभूल करणारे व्हिडिओ चीनने यूट्यूब प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याचे कारण देत गूगलने हा व्हिडिओ स्ट्राईक केले आहेत.