Home Business #Nagpur | नागपूरमध्ये जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे भव्य दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री

#Nagpur | नागपूरमध्ये जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे भव्य दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री

19 ते 21 जुलै पर्यंत हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ, नागपूर येथे राहील सुरु

नागपूर ब्यूरो: महाराष्ट्रातील 60 वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेले जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स नागपूरकरांसाठी खास भव्य दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री घेऊन येत आहेत. हे प्रदर्शन 19 ते 21 जुलै 2025 दरम्यान हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ, नागपूर येथे सकाळी 10.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात अस्सल सोने व हिऱ्यांचे दागिने, आधुनिक तसेच पारंपरिक डिझाईनमध्ये उपलब्ध असतील. विवाहसोहळा, खास प्रसंग, किंवा दैनंदिन वापरासाठी योग्य असे आकर्षक दागिने या ठिकाणी पाहायला व खरेदीसाठी मिळणार आहेत.

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स हे ब्रँड महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रसिद्ध असून त्यांच्या अनेक शाखा या भागांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. विश्वासार्हता, दर्जा व पारदर्शक व्यवहारामुळे त्यांनी ग्राहकांमध्ये खास स्थान निर्माण केले आहे.

या प्रदर्शनात ग्राहकांना उत्तम सेवा, आधुनिक संग्रह आणि योग्य दरात उच्च दर्जाचे दागिने मिळतील याची खात्री देण्यात आली आहे. नागपूरकरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि भव्य कलेक्शनमधून आपल्या पसंतीचे दागिने निवडावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ही एक अशी संधी आहे जिथे परंपरा, गुणवत्ता आणि सौंदर्य यांचा अद्वितीय संगम पाहायला मिळणार आहे.