Home Nagpur #Nagpur | जलतरणात विक्रम करणाऱ्या जयंत दुबळे यांचा विभागीय आयुक्तांकडुन गौरव

#Nagpur | जलतरणात विक्रम करणाऱ्या जयंत दुबळे यांचा विभागीय आयुक्तांकडुन गौरव

नागपूर : सागरी जलतरण मोहिमेमध्ये अत्यंत कठिण मानली जाणारी इंग्लिश खाडी टू वे पोहून आशियाई साहसी जलतरणात विक्रम केल्याबद्दल विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी जयंत दुबळे याचा पुष्पगुच्छ देवून गौरव केला. आंतरराष्ट्रिय सागरी जलतरणामध्ये केलेल्या साहसी उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.
इंग्लडची जलप्रसिध्दी असलेली इंग्लिश खाडी इंग्लड ते फ्रास व फ्रास ते इंगलड असे टू वे 70 किलोमीटरचे अंतर 31 तास 29 मिनिटांमध्ये जयंत दुबळे व त्यांच्या टिमने पाहून पुर्ण केले. हा विक्रम दिनांक 18 व 19 जुलै 2023 रोजी केला आहे. या उपक्रमांमुळे नागपुरचे नाव आंतरराष्ट्रिय सागरी जलतरणामध्ये अंकित झाले आहे. यावेळी विभागीय क्रिडा उपसंचालक शेखर पाटिल, सेवानिवृत्त क्रिडा सहसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे उपस्थित होते.

जलतरणाच्या क्षेत्रात नावलौकिक मिळविल्याबद्दल विशेष शुभेच्छा देतांना विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी म्हणाल्या की, नागपूर मधुन सागरी जलतरणपटू तयार व्हावेत तसेच इतर प्रकारातही येथील युवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रिडा विभागातर्फे जलतरणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करावे अशा सुचना यावेळी दिल्यात.

इंग्लिश खाडी पार करणे अनेकांना शक्य होत नाही, परंतु जयंत दुबळे यांनी ते शक्य करुन दाखविले. ही खाडी पोहण्याचा आनंद होत असून नागपूर येथुनही सागरी जलतरणपटु तयार व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जयंत दुबळे यांनी यावेळी सांगितले.

Previous article#Maha_Metro | टेकड़ी पुल तोड़ने का काम 40% पूर्ण
Next articleमहाहॅण्डलूम परिसरात 7 ऑगस्ट रोजी साजरा होणार राष्ट्रीय हातमाग दिवस
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).